अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून महाविद्यालय स्तरावर सुरू झाली. पहिली गुणवत्ता यादी ११ जुलैला लागेल. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १२ जुलै ते १५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, अकरावीसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा सुमारे ११ हजार जागा रिक्त राहणार आहेत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ठराविक महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा आग्रह न धरता पालकांनी गुणवत्तेनुसार मिळालेल्या महाविद्यालयात पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी केले आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्रात कधी परतणार? एकनाथ शिंदे गटाने काय दिले उत्तर?)
दुसरी व तिसरी गुणवत्ता यादी केव्हा लागणार?
प्रवेश अर्ज ५ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी ६ ते १० जुलैदरम्यान होईल. दुसरी गुणवत्ता यादी १६ जुलैला लागेल. २३ जुलै रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. सोलापूर जिल्ह्यात ६४ हजार ६५२ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६३ हजार १९६ विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या एकूण जागा ७४ हजार ५८० आहेत. सर्वांना प्रवेश मिळून सुमारे ११ हजार जागा शिल्लक राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community