सध्या एकनाथ शिंदेंच्या बंडामागे कोणाकोणाचा हात असेल याबद्दल खूप चर्चा होत असते. कुणी असं म्हणत आहे की यामागे भाजपाचा हात आहे, कुणी असं म्हणत आहे की यामागे शरद पवार यांचा हात आहे. तर कुणाचं असं म्हणणं आहे की यामागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना बंड करायला लावलं. ही गोष्टी अगदी खरी आहे. या बंडामागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे. चला तर जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांची योजना नेमकी काय होती.
( हेही वाचा : महाराष्ट्रात कधी परतणार? एकनाथ शिंदे गटाने काय दिले उत्तर?)
नेत्यांशी जवळीक नसलेले व जनतेशी संपर्क नसलेले चाणक्य काहीच कामाचे नसतात
उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वपक्षातील विरोधकांना सुरुवातील व्यवस्थित बाजूला केलं. यात राणेंपासून अनेक नेते अहएत. अगदी स्वतःच्या भावालाही बाजूला केलं. या सर्व कटात त्यांची साथ दिली ती सो कॉल्ड चाणक्य यांनी. अगदी खरं सांगायचं झालं तर हे किचन पॉलिटिक्स होतं. या गोष्टीला प्रत्यक्ष राजकारणात किंमत शून्य. आपले विरोधक बाजूला सारल्यनंतर आपले जे समर्थक ते खर्या अर्थाने चाणक्य असले पाहिजे. भुवया उडवणारे, कोणत्याही आमदार, खासदार, नेत्यांशी जवळीक नसलेले व जनतेशी संपर्क नसलेले चाणक्य काहीच कामाचे नसतात.
ते तुम्हाला सर्वोच्च पदावर नेतात असं वाटतं. पण ते पद इतकं उंच असतं की उंचावरुन आपटताना दुखतंही खूप. राज ठाकरे यांनी एका भाषणात त्यांच्या आजोबांचा संदर्भ देऊन म्हटलं होतं, “एखाद्याला आपटायचं असेल तर त्याला आधी उचलावं लागतं.” हे वाक्य खूप महत्वाचं आहे. शिंदे गट आम्ही पाटणकर काढा पिणार नाही, असं का म्हणतोय? पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्नीचं माहेर. हे किचन पॉलिटिक्स आहे.
बंडामागे मास्टर प्लान
उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाहीत, त्यांच्या समस्या समजून घेत नाहीत. त्यात सो कॉल्ड चाणक्यांना पुढे करतात. त्यांच्या पत्नीचे माहेरचे लोक सगळीकडे लुडबुड करतात, कामे करुन देत नाहीत, राष्ट्रवादिचे नेते शिवसेनेच्या गडात जाऊन म्हणतात की हा गड आपल्याला मिळवायचाय आणि या सर्व गोष्टींकडे उद्धव ठाकरे दुर्लक्ष करतात. म्हणून ही योजना उद्धव ठाकरे यांनीच रचली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे शिंदे यांच्या बंडामागे अशाप्रकारचा मास्टर प्लान उद्धव ठाकरे यांनी तयार केला होता.
Join Our WhatsApp Community