एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शनिवारी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी बरं झालं शिवसेनेतून जी घाण होती ती निघून गेली, असे विधान केले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले केसरकर
आदित्य ठाकरे हे डिसेंट आहेत, त्यांनी डिसेंटच रहावं, असे केसरकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले. इतकेच नाही तर ते पुढे असेही म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की शिवसेनेतून घाण गेली, आणि पुन्हा तेच म्हणतात त्या घाणीसाठी दरवाजे उघडे ठेवले आहे, हे कसं शक्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – फुटीर आमदारांच्या विरोधात रस्त्यावरील लढाईत ‘सेने’च्या रागिणी राहणार आघाडीवर!)
आदित्य ठाकरे यांच्याबाबत मला आदर आहे, मात्र तो आदर त्यांच्या आजोबा, पंजोबांमुळे आहे, असेही ते म्हणाले. आता आदित्य ठाकरे यांनी ठरवावे की, त्यांनी कोणती भाषा शिकायची उद्धव ठाकरे यांची की राऊत यांची. पक्षप्रमुखांचं मन मोठंच आहे, हे केव्हाही मान्य करतो, मात्र पक्ष जेव्हा संपण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याकडे गांभीर्याने पहावं, लागतं. कोणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करू नये, मी पुन्हा विनंती करतो. माझ्यासोबत राठोड, भुसे, गुलाबराव पाटील आहेत, त्यांना विचारा, त्यांच्यावर केसेस दाखल आहेत. तुम्ही अशा माणसांना पक्षातून घाण गेली असे बोलता. फेकून द्या वृत्तीचा जमानाच झाला, असे देखील त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community