एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. राज्यात एकप्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारणाची ही विस्कटलेली घडी कशी बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, रविवारी एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत अमित शहा यांनी बंडखोरांना आश्वासन दिले आहे.
सुरक्षेचे आश्वासन
राज्यात बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. त्यामुळे या आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून बंडखोर आमदारांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः अपात्रता टाळण्यासाठी बंडखोर आमदारांकडे एकच पर्याय, शिवसेनेचा दावा)
शिंदे गट न्यायालयात जाणार
16 बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता शिवसेनेकडून पावले उचलण्यात आली आहे. या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी आता शिवसेनेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात देखील बंडखोर आमदार, फडणवीस आणि शहांमध्ये चर्चा झाली आहे. या कारवाईविरोधात शिंदे गट न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आपलं म्हणणं मांडण्यासाठी 2 दिवसांऐवजी 7 दिवसांची मुदत देण्याची मागणी देखील आमदार करणार आहेत.
(हेही वाचाः आनंद दिघे माझ्यामुळे ‘धर्मवीर’ झाले, राऊतांचे खळबळजनक विधान)
Join Our WhatsApp Community