एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढतच चालला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच सगळ्या घडामोडींमध्ये आता शिंदे गटात शामील झालेले नाराज आमदार दीपक केसरकर यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. नाराज आमदार दीपक केसरकर यांनी एक खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांना भेटण्याआधी नाराज आमदारांशी तडजोड करण्यास तयार होते. पण पवारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर, मात्र ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली.
चुकीचे सल्ले देणा-यांमुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे. सुरुवातीला बोलणी सुरु होती. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर शिवसेनेने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
( हेही वाचा: राज्यातील ‘नाचे’ आमदार केंद्राच्या तालावर नाचताहेत; ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका )
चुकीचे सल्ले देणा-यांमुळेच आज शिवसेना अडचणीत
आमदारांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा सुरुवातीला शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना भावनिक आवाहनदेखील केले होते. मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे, मात्र बंडखोरांनी समोर येऊन मला तसे सांगावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले. यावर बोलताना, केसरकर म्हणाले की सुरुवातीला उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते. मात्र शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. चुकीचे सल्ले देणा-यांमुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याचे केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community