महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, नाराज आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाच्या विरोधात शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाकडून न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायमू्र्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
ही कायदेशीर कारवाई जिंकण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून कायदेपंडितांची फौज मैदानात उतरवण्यात आली आहे. या फौजेमध्ये कोण -कोण आहेत ते पाहूया.
( हेही वाचा Maharashtra Political Crisis: गुलाबराव पाटलांचा तो व्हिडीओ ट्वीट करत, राऊतांनी दिला केसरकरांना इशारा )
हे आहेत शिंदे गटाचे वकील
- ज्येष्ठ वकील हरिश साळवी
- महेश जेठमलानी
- माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी
- ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह
ठाकरे सरकारच्यावतीने हे वकील मैदानात
- ज्येष्ठ वकील कपील सिब्बल
- ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी
- ज्येष्ठ वकील राजीव धवन
- देवदत्त कामत