‘या…मला अटक करा!’ ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी केले ट्वीट

149

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना ईडीने समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ट्वीट केले आहे.

( हेही वाचा : अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध)

संजय राऊत यांचे ट्वीट

“मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा!” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यांनी या ट्वीटच्या खाली राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.

अडचणीत वाढ 

मिळालेल्या माहितीनुसार, राऊतांना गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंबंधित समन्स बजावण्यात आले आहे. राऊतांच्या पत्नीच्या नावे झालेल्या व्यवहारांवरही ईडीची नजर आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता सुद्धा याआधी जप्त करण्यात आलेली आहे. सध्या राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना मंत्री अनिल परब यांची सलग तीन दिवस ईडीकडून चौकशी करण्यात आली यानंतर आता संजय राऊतांनाही ईडीचे समन्स आल्याने सेनेच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.