गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सत्तानाट्य सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळात बड्या नेत्यांच्या बैठकांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
काय केले ट्विट
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोना झाला होता. आता त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटिजेन पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.
Join Our WhatsApp Communityकाल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022