गेल्या काही दिवासांपूर्वी मराठी अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अडचणीत सापडली होती. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मराठी अभिनेत्री केतकी चितळेला २१ प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात तिच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.
(हेही वाचा- BDD चाळीतील निवृत्त पोलिसांना 50 लाखांऐवजी 25 लाखात मिळणार घर)
दरम्यान, केतकी चितळेला २२ व्या एफआयआरमध्ये नुकताच जामीन मंजूर झाला. केतकीविरोधातील २१ पेक्षा अधिक प्रलंबित एफआयआरमध्ये अटक करणार नसल्याचे निेवेदन महाराष्ट्र पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलं होतं. न्यायालयाने हे निवेदन स्वीकारले आहे.
[Post Aimed At Sharad Pawar]
Breaking : Maharashtra police tells #BombayHighCourt that it will not arrest Marathi Actor #KetakiChitale in over 21 FIRs pending against her. Chitale was recently granted bail in the 22nd FIR.
HC accepts statement. pic.twitter.com/p6A5KTdLU2
— Live Law (@LiveLawIndia) June 27, 2022
फेसबुकवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकऱणी केतकीविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये केतकीला मोठा दिलासा मिळाला आहे. तिच्याविरोधात २१ प्रलंबित एफआयआरमध्ये उच्च न्यायालयाने केतकीला अंतरिम दिला आहे. दरम्यान, २३ जून रोजी केतकीची ठाणे कारागृहातून सुटका झाली, अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया केतकीने तिच्या वकिलांना दिली होती.
Join Our WhatsApp Community