शिवसेनेतील ३९ आमदारांना घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर पडले आहेत. त्यामध्ये ४ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत, त्यातील एक बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती खात्याचे आहेत. या मंत्र्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्यातील मंत्रिमंडळातील ४ खाती शिवसेनेच्याच कॅबिनेट मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र शिवसेनेकडील राज्यमंत्र्यांच्या खात्यांतील ९ खाती राष्ट्रवादीकडे आणि ६ खाती काँग्रेसकडे देण्यात आली आहेत. अशा प्रकारे मंत्रिपदाचा फेरबदल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला आहे.
कोणाकडे कोणतं खातं?
४ कॅबिनेट मंत्री
- १. गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री) – अनिल परब (शिवसेना)
- २. एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) – सुभाष देसाई (शिवसेना)
- ३. दादा भुसे (कृषी मंत्री) – शंकरराव गडाख (शिवसेना)
- ४. उदय सामंत (उच्च तंत्र शिक्षण मंत्री) – आदित्य ठाकरे (शिवसेना)
- संदिपान आसाराम भुमरे (रोजगार हमी, फलोत्पादन खाते) – शंकर यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष)
(हेही वाचा बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात परतावे! उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)
५ राज्यमंत्री
१. अब्दुल सत्तार
- प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री, महसूल, ग्राविकास, बंदरे, खार जमिनी विकास) (राष्ट्रवादी)
२. शंभूराज शिवाजीराव देसाई
- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण) (राष्ट्रवादी)
- विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त) (काँग्रेस)
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील (नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन) (काँग्रेस)
३. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर
- विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण) (काँग्रेस)
- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), (राष्ट्रवादी)
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), (काँग्रेस)
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) (राष्ट्रवादी)
(हेही वाचा राज्यातील सत्तासंघर्षात न्यायालयाच्या निर्णयाने नवा ट्विस्ट, झिरवळ,प्रभु,केंद्राला नोटीस )
४. अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री
- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), (राष्ट्रवादी)
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), (काँग्रेस)
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) (राष्ट्रवादी)
प्रहार जनशक्ती
५. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), (राष्ट्रवादी)
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), (काँग्रेस)
- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), (राष्ट्रवादी)
- दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) (राष्ट्रवादी)
(हेही वाचा ‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप)
Join Our WhatsApp Community