स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या तायक्वांदो अकॅडेमीने विशेष योजनेद्वारे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. १५ दिवसांसाठी हे शिबीर होणार आहे. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने अभिनव योजना निर्माण केली आहे. जे या प्रशिक्षणाला नियमित येतील, त्यांचे शुल्क परत दिले जाणार आहे.
…तर दीड हजार रुपये परत मिळणार
तायक्वांदो पुमसे सांगोष्ठी एवं प्रशिक्षण शिबीर असे हे शिबीर आयोजित केले आहे. १५ दिवसांचे हे शिबीर होणार आहे. यात १४ दिवस प्रशिक्षण आणि १ दिवस प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हे शिबीर होणार आहे. १२ ते १७ वयोगटासाठी हे शिबीर होणार आहे. यासाठी १२ मुली आणि १२ मुले यांना प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी प्रशिक्षणार्थींना १५०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. मात्र या १५ दिवसांच्या कालावधी जेवढे दिवस प्रशिक्षणार्थी अनुपस्थित राहतील, त्यातील प्रत्येक दिवस १०० रुपये दंड आकाराला जाईल. तेवढी रक्कम अनामत रकमेतून वजा करून शिल्लक रक्कम परत केली जाणार आहे. जर प्रशिक्षणार्थी नियमित १५ दिवस आला तर त्याची सर्व अनामत रकम १५०० रुपये परत केले जातील. यात सर्वोच्च गुणांक प्राप्त ३ प्रशिक्षणार्थींना ‘माझी जन्मठेप’ पुस्तक अथवा कोणतेही सावरकरी साहित्य दिले जाईल. प्रशिक्षणार्थींना गणवेश, बूट, वजन, नॅपकिन, वही, पेन आणि पाण्याची बाटली सोबत आणावे लागणार आहेत.
(हेही वाचा फेरबदलाचा फटका कुणाला? नाराजांना दणका देताना शिवसेनेची १५ खाती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात!)
Join Our WhatsApp Community