दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत तर ते बंडखोर कसे ठरू शकतात? एकनाथ शिंदे यांच्या गटाकडील आमदारांच्या गटाला बंडखोर आमदार मानत नाहीत, ते स्वतःला शिवसेनेचे २४ कॅरेटचे आमदार समजतात, मी त्यांना बंडखोर मानत नाही. मूळ शिवसेनेकडून प्रस्ताव आला, तर भाजप त्याचा विचार करेल. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून अजून प्रस्ताव आला नाही, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर सांगितले.
भाजप आजही वेट अँड वॉच भूमिकेत!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आमंत्रित केली. न्यायालयाने दिलेला निर्णय, शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती त्यावर या बैठकीत चर्चा झाली. राज्यात भविष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर भाजप पूर्ण लक्ष देऊन आहे, त्यानुसार भविष्यात निर्णय घेण्याचे ठरवले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर विधिमंडळात होणाऱ्या परिस्थितीचेही आकलन केले आहे. या सर्व परिस्थितीकडे भाजपा ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत राहणार आहे, असेही भाजपा नेते मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा फेरबदलाचा फटका कुणाला? नाराजांना दणका देताना शिवसेनेची १५ खाती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात!)
शिंदे गटाकडून प्रस्ताव येतील तसे निर्णय घेऊ
शिवसेनेत जी फूट पडली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता मूळ शिवसेना बनली आहे. त्यावरही चर्चा केली आहे. येणाऱ्या काळात जी काही परिस्थिती निर्माण होईल, राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जसे जसे शिंदे गटाकडून प्रस्ताव येतील, तसे पुन्हा कोअर कमिटी बैठक घेऊन योग्य निर्णय घेईल. सोमवारी, २७ जून रोजी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाला नाही. भविष्यात रोज होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ही बैठक घेतली आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community