Mohammed Zubair Arrested: धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरुन पत्रकार मोहम्मद झुबेरला अटक

132

ऑल्ट न्यूजचे (Alt news) सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना न्यायालयाने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीसी कलम 153/295 अंतर्गत अटक केली आहे.

मोहम्मद झुबेर यांना कायदेशीर मदत मिळण्यासाठीही काहीसा दिलासा मिळाला आहे. झुबेर यांना कायदेशीर बाबींसाठी दिवसातून एकदा अर्धा तास वकिलाला पोलीस कोठडीत भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

दिल्ली पोलीस काय म्हणाले?

दिल्ली पोलिसांकडून असे सांगण्यात आले की, मोहम्मद झुबेर यांनी एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले फोटो आणि शब्द हे अत्यंत प्रक्षोभक असून, लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी हेतूपुरस्सर आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते. या पोस्टच्या आधारे वरील गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी झुबेर यांना पुरेशा पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आल्याचा दावा केला आणि त्यांना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी मागितली.

( हेही वाचा आदित्य म्हणतात, ‘त्यांना’ विधान भवनाची पायरी चढू देणार नाही! )

एफआयआरची प्रत देण्यात आली नाही 

याबाबत बोलताना Alt News चे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद झुबेर यांना 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे. प्रतिक सिन्हा म्हणाले की, ज्या कलमांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे, त्या कलमांमध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र, तसे करण्यात आलेले नाही. अनेक वेळा विनंती करुनही आम्हाला एफआयआरची प्रत देण्यात आली नाही, असे प्रतीक सिन्हा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.