सरकार 1 जुलैपासून नवीन कामगार संहिता (New Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे नोकरदार लोकांसाठी अनेक गोष्टी बदलतील. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसारखे सेवानिवृत्तीचे फायदे वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय साप्ताहिक सुट्याही दोन ते तीन वाढू शकतात. नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसांत कोणत्याही कंपनीकडून पूर्ण पैसे मिळतील. जे सध्या, पूर्ण आणि अंतिम पेमेंटसाठी 30 ते 60 दिवस लागतात.
(हेही वाचा – Period Tracker on Whatsapp: आता व्हॉट्सअपवर कळणार मासिक पाळीची तारीख )
देशात केंद्र सरकार लवकरच कामगार सुधारणांसाठी (Labor Reform) चार नवीन कामगार संहिता लागू (Labour Codes) करू शकते. या संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, पीएफ आणि ग्रॅच्युइटी यासह अनेक गोष्टी बदलणार आहेत. एखाद्या संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याचे बंधन काढून सरकार ग्रॅच्युइटीसाठी एक वर्ष करू शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
नियमात बदल केल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा
असे झाल्यास, जो कर्मचारी एका वर्षासाठी कोणत्याही ठिकाणी काम करत असेल तर त्याचा ग्रॅच्युइटीवर हक्क असणार आहे. सरकारने ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल केल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे एकप्रकारे बक्षीस आहे. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते. कर्मचार्यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक लहानसा भाग कापला जातो, परंतु तो परत देताना कंपनी मोठ्या स्वरूपात देत असते.
कोणाला मिळते ग्रॅच्युइटी
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत, हा लाभ 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येतो. तसेच संस्थेत सलग 5 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने नोकरी सोडली, परंतु त्याने ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले असतील तर त्याला हा लाभ मिळतो.
Join Our WhatsApp Community