मध्य रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्या

171

मध्य रेल्वे दि. ५ जून २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत लातूर- पंढरपूर, मिरज- पंढरपूर, मिरज – कुर्डूवाडी, पंढरपूर -मिरज, सोलापूर – पंढरपूर, नागपूर – मिरज, नागपूर – पंढरपूर, नवीन अमरावती – पंढरपूर आणि खामगाव – पंढरपूर दरम्यान आषाढी विशेष गाड्या चालवणार आहेत. तपशील खालीलप्रमाणे:

१. लातूर – पंढरपूर (१२ सेवा)

गाडी क्रमांक 01101 आषाढी विशेष दि. ५.७.२०२२, ६.७.२०२२, ८.७.२०२२, ११.७.२०२२, १२.७.२०२२ आणि १३.७.२०२२ (६ सेवा) रोजी लातूर येथून ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01102 आषाढी विशेष दि. ५.७.२०२२, ६.७.२०२२, ८.७.२०२२, ११.७.२०२२, १२.७.२०२२ आणि १३.७.२०२२ (६ सेवा) रोजी पंढरपूर येथून १४.३२ वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.

थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बारसी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडनिंब.

( हेही वाचा इतरांना रिक्षावाला, पानवाला म्हणणाऱ्या राऊतांचा ‘मनसे’ने सांगितला इतिहास )

२. मिरज – पंढरपूर अनारक्षित विशेष (२० सेवा)

गाडी क्रमांक 01107 अनारक्षित विशेष गाडी दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) दरम्यान मिरज येथून ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०८.२५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01108 अनारक्षित विशेष गाडी दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) पर्यंत पंढरपूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.

थांबे: आरग, बेळंकी, सुलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासूद आणि सांगोला.

३. मिरज – कुर्डूवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (२० सेवा)

गाडी क्रमांक 01109 अनारक्षित विशेष दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) पर्यंत मिरज येथून १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01110 अनारक्षित विशेष दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) पर्यंत कुर्डुवाडी येथून १९.३० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: आरग, बेळंकी, सलाग्रे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासुद, सांगोला, पंढरपूर आणि मोडनिंब.

4. पंढरपूर – मिरज विशेष (८ सेवा)

गाडी क्रमांक 01111 विशेष दि. ४.७.२०२२, ५.७.२०२२; ९.७.२०२२ आणि ११.७.२०२२ (४ सेवा) रोजी पंढरपूर येथून ०९.२० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01112 विशेष दि. ४.७.२०२२,५.७.२०२२, ९.७.२०२२ आणि ११.७.२०२२ (४ सेवा) रोजी मिरज येथून १६.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.

थांबे: सांगोला, वासुद, जावळा, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सुलगरे, बेळंकी आणि आरग

५. सोलापूर – पंढरपूर अनारक्षित विशेष (२० सेवा)

गाडी क्रमांक 01113 डेमू विशेष दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) पर्यंत सोलापूर येथून १०.१० वाजता सुटेल आणि पंढरपूरला त्याच दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01114 डेमू विशेष दि. ५.७.२०२२ ते १४.७.२०२२ (१० सेवा) पर्यंत पंढरपूर येथून १५. ४० वाजता सुटेल (१० सेवा) आणि सोलापूर येथे त्याच दिवशी १८.५० वाजता पोहोचेल.

थांबे: बाळे, पाकणी, मुंढेवाडी, मोहोळ, मलिकपेठ, अंगार, वाकाव, माढा, कुर्डुवाडी आणि मोडनिंब

६. नागपूर – मिरज विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01115 विशेष दि. ६.७.२०२२ आणि ९.७.२०२२ (२ सेवा) रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01116 विशेष मिरज येथून दि. ७.७.२०२२ आणि १०.७.२०२२ (२ सेवा) रोजी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ व सलाग्रे.

7. नागपूर – पंढरपूर विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01117 विशेष नागपूर येथून दि. ७.७.२०२२ आणि १०.७.२०२२ (२ सेवा) रोजी ०८.५० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01118 विशेष पंढरपूर येथून दि. ८.७.२०२२ आणि ११.७.२०२२ (२ सेवा) रोजी १७.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

८. नवीन अमरावती – पंढरपूर विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01119 विशेष गाडी दि. ६.७.२०२२ आणि ९.७.२०२२ रोजी (२ सेवा) नवीन अमरावती येथून १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01120 विशेष दि. ७.७.२०२२ आणि १०.७.२०२२ रोजी (२ सेवा) पंढरपूर येथून १९.१० वाजता सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जालंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

९. खामगाव – पंढरपूर विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव येथून दि. ७.७.२०२२ आणि १०.७.२०२२ (२ सेवा) रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून दि. ८.७.२०२२ आणि ११.७.२०२२ (२ सेवा) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १९.३० वाजता खामगाव येथे पोहोचेल.

थांबे: जालंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.