महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करावे, बहुमत नसेल तर महाविकास आघाडीने योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला राजकीय सत्तासंघर्षादरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. हा सल्ला देताना त्यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केला. राज्यातील राजकीय अस्थिरतेसोबत राऊतांचं मनही अस्थिर झाल्याने ते टीका करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – इतरांना रिक्षावाला, पानवाला म्हणणाऱ्या राऊतांचा ‘मनसे’ने सांगितला इतिहास)
हे राज्यपालांचे कर्तव्य
नागपूरात माध्यमांशी बोलत असताना राज्यपालांसंदर्भात सवाल केला असता ते म्हणाले, कोणतेही पत्र त्यांना मिळाल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्राच्या प्रशासनाकडून खुलासा आणि माहिती करून घेणं हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. त्यामुळे इतर कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असताना काही लोक जीआर काढून पैसे कमवण्याचे काम करत आहेत, अशी शंका आल्याने हे पत्र दिले आहे. त्यामुळे राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती घेणे योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसे राऊतांचे मनही अस्थिर होणार
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, राज्यात अस्थिरता वाढेल तसे राऊतांचे मनही अस्थिर होणार आहे, त्यामुळे ते काय बोलतील याची कल्पना नाही. पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणात राऊतांकडून नवे शब्द ऐकायला मिळतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community