महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील सात दिवसांपासून राज्य सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडानंतर, मागच्या काही दिवसांत सरकारने असंख्य जीआर मंजूर करुन घेतले. आता राज्यपालांनी या घाई-घाईने मंजूर केलेल्या जीआरबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी पत्र लिहून सरकारकडून 3 दिवसांत मंजूर झालेल्या जीआरची माहिती मागवली आहे.
5 दिवसांत 280 जीआर
- 24 जून- 58 जीआर
- 23 जून- 57 जीआर
- 22जून- 54 जीआर
- 21 जून- 81 जीआर
- 20 जून 30 जीआर
प्रवीण दरेकर यांनी लिहिले होते पत्र
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित, म्हटले होते की राज्यातील अस्थिर परिस्थिती पाहता यात हस्तक्षेप करावा. राज्यात नवनवीन जीआर काढले जात आहेत. तत्काळ निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे.
Join Our WhatsApp Community