पोलीस काॅन्सेटबल पदाच्या भरतीमध्ये आता पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून, नवीन नियमावली लागू करण्याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यातील विविध पोलीस घटकांत 7 हजार काॅन्सेटबलची पदे भरण्यात येणार आहेत.
मैदानी चाचणी पहिल्यांदा घेण्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना भरतीसाठी अधिक संधी मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा व त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेऊन अंतिम गुणवत्तादायी निवड यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भरतीसाठी होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बदलेल्या नियमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना तुलनेत कमी संधी निर्माण झाली होती. त्यामुळे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात पोलीस भरतीत ही पद्धत रद्द करुन पूर्वरत मैदानी चाचणी प्रथम व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचे नमूद केले होते.
( हेही वाचा: Mumbai Building Collapse Update: कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू )
ग्रामीण उमेदवारांना होणार लाभ
ग्रामीण भागातील तरुणांची मागणी लक्षात घेऊन, पोलीस भरतीच्या सेवा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने त्याचा उमेदवारांना अधिक लाभ होईल, असे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community