एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाला आहे. हे सरकार कोसळण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेतील जवळपास सर्वच मंत्री हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे त्या सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या सर्व फाईल्स मागवून घेतल्या आहेत.
फायली सादर करण्याचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याची जबाबदारी आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे सोपवली आहे. तसेच मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या खात्याच्या सर्व फायली मागवून घेतल्या आहेत. याबाबत त्यांनी अधिका-यांना आदेश दिले आहेत. तसेच 1 जूननंतर एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यामार्फत घेतलेल्या निर्णयांची माहितीही उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे.
(हेही वाचाः शेवट गोड करा… शिंदे गटाची उद्धव ठाकरेंकडे मागणी)
कोणाकडे कोणतं खातं?
गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री) – अनिल परब
एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) – सुभाष देसाई
दादा भुसे (कृषी मंत्री) – शंकरराव गडाख
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री, महसूल, ग्राविकास, बंदरे, खार जमिनी विकास) – प्राजक्त तनपुरे
उदय सामंत (उच्च तंत्र शिक्षण मंत्री) – आदित्य ठाकरे
राजेंद्र पाटील यड्रावरकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य) – सुभाष देसाई
बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण) – आदिती तटकरे
(हेही वाचाः “… तर नावं सांगा”, हॉटेल बाहेर येताच एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज)
राज्य मंत्र्यांकडील खातेवाटपात बदल
- शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती
- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण)
- विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील
2. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती
- विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण),
- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)
3. अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती
- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल),
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास),
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)
4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती
- आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण),
- सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार),
- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास),
- दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)
(हेही वाचाः तुम्हाला शिवसेना वाचवायचीय की राष्ट्रवादी मोठी करायचीय? शिंदे गटाचा पवारांना थेट सवाल)