कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत

146

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात, असे निर्देशही दिले आहेत.

(हेही वाचाः राजकीय अस्थिरतेत शेकडो GR, हजारो कोटींच्या गैरव्यवहाराचा दरेकरांचा आरोप)

19 जणांचा मृत्यू

कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटीची चार मजली इमारत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. कुर्ल्यातील या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ही कमी होती. तर अनेक जण जखमी झाले होते. उपचारादरम्यान या जखमींचा मृत्यू झाल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या दुर्घटनेदरम्यान एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यामध्ये 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः Mumbai Building Collapse Update: सरकारच्या मदतीआधी थेट गुवाहाटीतून शिंदेंच्या सूचनेवरुन आर्थिक मदत जाहीर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.