महाराष्ट्रात पोलिसांच्या 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी याला मंजुरी देण्यात आली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या भरती संबंधिची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : MSRTC : एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ)
राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश
या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही पोलीस भरती दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील सात हजार 231 पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे. काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार असून तसे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया
सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकर भरतीची प्रक्रिया लांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेलाही बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Join Our WhatsApp Community