हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होईल भरभर! होणार ‘हे’ महत्वाचे बदल

199

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून हार्बर मार्गे गोरेगावला जाणाऱ्या लोकलचा प्रवास आता वेगवान होणार आहे. गोरेगाव ते माहिम दरम्यान असलेल्या वळणाची तीव्रता कमी करण्यात पश्चिम रेल्वेला यश आले आहे या मार्गावरील वेगमर्यादा हटविण्यात आल्याने आता लोकलचा वेग वाढणार आहे.

( हेही वाचा : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! १ हजार एसटी गाड्यांचे नियोजन)

वेग वाढणार, वेळेची बचत होणार

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोरेगावदरम्यान लोकलच्या ११२ फेऱ्या होतात. माहिम ते गोरेगाव दरम्यान तीव्र वळणामुळे अनेक ठिकाणी ३० किमी प्रति तास आणि त्याहून कमी अशी वेगमर्यादा होती. या वेगमर्यादेमुळे लोकलच्या वेळांवर परिणाम होत असे परिणामी या मार्गावरील वळणाची तीव्रता कमी करण्यासाठी पंधरा दिवस माहिम स्थानकातील थांबा रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता.

प्रवाशांना फायदा 

माहिम स्थानकात ३५ किमी प्रति तास अशी वेगमर्यादा होती ही मर्यादा लवकरच ५० किमी प्रति तास इतकी होणार आहे. दादर आणि भाईंदर स्थानकातील वेगमर्यादा १५ वरून ३० किमी प्रति तास अशी बदलण्यात आलेली आहे. वेगमर्यादा वाढल्यामुळे जवळपास ५ ते १० मिनिटे प्रवासवेळेत बचत होणार आहे. अंधेरी ते गोरेगाव दरम्यान सुद्धा काही ठिकाणी वेगमर्यादा हटविण्याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम मार्गी लागल्यावर आणखी वेळेची बचत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.