मागच्या नऊ दिवसांपासून राज्यात जे काही सत्तानाट्य सुरु होते अखरे बुधवारी रात्री त्यावर पडदा पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आताच्या घडीला कोणती प्रमुख आव्हाने आहेत ते पाहुया.
( हेही वाचा सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, महाराष्ट्राचे डोळे पाणावले! भाजपाचा टोला )
उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं
- बंडाने हादरुन गेलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देणे.
- एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा सांगितल्याने कायदेशीर लढाई लढणे
- बंडखोर आमदारांच्या आणि नेत्यांच्या मतदार संघात पुन्हा संघटना बांधणी करणे
- एकाचवेळी अनेक ज्येष्ठ नेते सोडून गेल्याने पोकळी भरुन काढण्यासाठी दुसरे नेतृत्व तयार करणे
- महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा यश मिळवून देणे
- बंडखोरांना घेऊन सत्तेवर येणा-या आक्रमक भाजपचा सामना करणे
- 1990 नंतर विधानसभेत सर्वात कमी संख्याबळ झाल्याने पुन्हा अस्तित्व निर्माण करणे