मागच्या काही दिवसांपासून चाललेल्या राज्याच्या सत्तानाट्यावर अखेर बुधवारी रात्री पडदा पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, ईडीने मला समन्स पाठवले आहे. त्यामुळे मी उद्या चौकशीला हजर राहणार आहे. इतरांसारखा पळून जाणार नाही, असे राऊत म्हणाले. केवळ ईडी कारवाईच्या भीतीमुळे एकनाथ शिंदे गटात आमदारांची संख्या वाढल्याचा आरोप यापूर्वीच संजय राऊत यांनी केला होता.
ईडी चौकशीला सामोरे जाणार
गोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना सोमवारी ईडी कार्यलयाकडून चौकशीसाठी हजर राहण्यााबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पुर्वनियोजित राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत आपण हजर राहू शकणार नाही, शिवाय आपल्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. दुस-या दिवशी त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी चौकशीला सामोरे जाणार असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; बैठकीनंतर होणार औपचारिक घोषणा )
मी लढणारा शिवसैनिक
एकनाथ शिंदे गटातील निम्म्यापेक्षा अधिक आमदार हे केवळ ईडीच्या चौकशीला घाबरुन पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि शिवसेनेबद्दलची एकनिष्ठता समोर आली आहे. मी पळून जाणा-यांपैकी नाही तर लढणारा शिवसैनिक असल्याचे, म्हणत राऊतांनी नाराज आमदारांवर टीकेचे बाण सोडले आहेत.
Join Our WhatsApp Community