शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बच्चू कडूंना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्यावर तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. अकोल्यात जे रस्ते बांधलेच नाहीत त्यांच्या कामात १ कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आरोपानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; बैठकीनंतर होणार औपचारिक घोषणा)
पोलिसांकडून फाईल क्लोज
दरम्यान, बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा देखील करण्यात आला होता. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेले होते. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्याने प्रकरणच तथ्यहिन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट देण्यात आली असून या प्रकरणाची फाईल पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
बच्चू कडू यांच्यावर वंचित बहुजन आघाडीने आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. अकोल्याचे पालकमंत्री असताना बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर निधी वळता करत १ कोटी ९५ लाख रूपयांचा अपहार केला. असा आरोप करण्यात आलेला होता. तीन रस्त्याच्या कथित कामावरून याची ठिणगी पडली होती. तसेच आपल्या मर्जीतील कामांना प्राधान्य देत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली कामं पालकमंत्री या नात्यानं त्यांनी डावलली, असा आरोप करण्यात आलेला होता.
Join Our WhatsApp Community