ठाकरे सरकारने सत्ता जाण्याआधी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील सत्ता गेली तर येणा-या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचे दिसते. पण त्यामुळे काॅंग्रेसचे औरंगाबादचे पदाधिकारी नाराज झाले.
महाविकास आघाडी सरकाराने घेतलेल्या या निर्णयानंतर, बुधवारी लगेचच औरंगाबाद काॅंग्रेसचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला. उस्मानीपाठोपाठ काॅंग्रेसमधील इतर मुस्लीम पदाधिका-यांनीही धडाधड राजीनामे द्यायला सुरुवात केली. बुधवारी निर्णय झाला आणि गुरुवारी काॅंग्रेसच्या 22 पदाधिका-यांनी राजीनामे दिले.
( हेही वाचा: इतरांसारखा मी पळून जाणार नाही; ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार- संजय राऊत )
200 पदाधिका-यांचे राजीनामे
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे राजीनामे दिले. हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता काॅंग्रेसमधील 200 मुस्लिम पदाधिका-यांनीही राजीनामे दिले आहेत. शहराध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह 200 पदाधिकां-याचे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबाद काॅंग्रेसमध्ये पेटलेली ही आग विझवणे प्रदेशाध्यक्षांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. आधीच शिवसेना आणि भाजपच्या प्रभावाखाली असलेल्या औरंगाबादमध्ये काॅंग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाला आता मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community