भूस्खलनात लष्कराचा तळ उद्धवस्त, ७ मृत्यू, ४५ जण अद्याप ढिगाऱ्यात अडकले

152

गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूर राज्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री १०७ प्रादेशित लष्करी (टेरिटोरिअल आर्मी) छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली आहे.

(हेही वाचा – …पण भावनेच्या पलिकडे विकास असतो, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केसरकरांची प्रतिक्रिया)

या भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप साधारण ४५ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगतिले जात आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १९ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही घटना तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता, ज्याच्या संरक्षणासाठी १०७ टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अचानक भूस्खलन झाले. ज्यामध्ये अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.