औरंगाबादचे संभाजी नगर केल्याने उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व अबाधित राहिल का?

149

अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी जाताना सुद्धा ऑनलाईन राजीनामा दिला. देशातले हे पहिले असे मुख्यमंत्री होते जे शेवटपर्यंत फ्लोअरवर नव्हतेच, तर ऑनलाईनच होते. ठाकरेंनी राजीनामा द्यायच्या आधी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मनाबादचं धाराशिव केल्याची बातमी आहे.

( हेही वाचा : विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना बुडवून दाखवली )

उरलेल्या शिवसैनिकांना आपल्याला सोडून जाऊ नये

अनेकांना प्रश्न असा पडला असेल की उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर हे नामकरण करायला साफ नकार दिला होता. मग त्यांनी अचानक मंत्रीमंडळात हा निर्णय कसा घेतला आणि दोन्ही कॉंग्रेसने यास मान्यता कशी दिली? अर्थात यामागे शरद पवारांचं डोकं असू शकतं. आता ठाकरेंचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान कसं तरी भरुन काढावं लागणार. म्हणूनच जाता जाता दोन नामकरण करुन त्यांनी उरलेल्या शिवसैनिकांना आपल्याला सोडून जाऊ नये असाच संदेश दिला आहे.

लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेले शिवसैनिक भावनिक आहे. बाळासाहेब ठाकरे त्यांचे दैवत आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्या दैवताचे सुपुत्र आहेत, त्यात बाळासाहेबांनी माझ्या उद्धवला सांभाळा अशी विनंती देखील केली होती. त्यामुळे अनेक शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. आता संघटनात्मकदृष्ट्या ठाकरेंना आणखी नुकसान होणार आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. मुंबई स्वतःकडे ठेवणे ही त्यांची आता प्राथमिकता आहे.

केवळ डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामान्य जनता ही मूर्ख नसते. तिला सगळेच डावपेच कळत नसले तरी जनतेला कोणाला मत द्यायचं एवढं मात्र खरं. त्यामुळे नाव बदलल्यामुळे लगेच उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व अबाधित राहणार नाही. त्यांनी केवळ डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यातंही ते पुरते अडकले आहेत. कारण ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या खूप जवळ गेलेले आहेत आणि आता जाता जाता हिंदू मूव्ह त्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस ते मते मागायला जनतेत येतील किंवा ऑनलाईन मते मागतील तेव्हा त्यांच्यासमोर नेमकं कोणत्या मुद्द्यावर मते मागायचा हा प्रश्न असणारच आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.