उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे सरकार कोसळले. यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून गुरूवारी सकाळी भाजप नेते नितेश राणेंनी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचा – शरद पवार ते एकनाथ शिंदे! ४४ वर्षांनंतर ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती!)
शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागल्याचे म्हटले जात आहे. यावरच संजय राऊत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर वार केल्याच्या प्रयत्नाच्या आशयाचा फोटो शेअर केला असून नेमके हेच घडले असे कॅप्शन दिले. यालाच नितेश राणेंनी प्रत्युत्तर देत रिटर्न गिफ्ट अशा कॅप्शनचे ट्विट शेअर केले.
काय दिले प्रत्युत्तर
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर हा फोटो शेअर करत त्यांनी ‘रिटर्न गिफ्ट’, असे कॅप्शन देखील लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला एकनाथ शिंदेंच्या बाणाने उत्तर दिले आहे. राऊत यांनी खंजिर वाला एक फोटो ट्विट करत बंड केलेल्या आमदारांवर चांगलाच हल्लाबोल केला होता. यासोबत त्यांनी ‘नेमके हेच घडले!’, असे लिहिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर नितेश राणे यांनी राऊतांना त्यांच्याच स्टाईलने उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. या फोटोला नितेश राणे यांनी ‘कर्मा रिटर्न्स’, असेही लिहिले आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2022
गुरूवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले. दरम्यान, गुरूवारी ७.३० वाजता महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.