औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाचा निर्णय अवैध! फडणवीसांचा दावा

150
ज्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितल्यावर खरे तर जोवर बहुमत सिद्ध होत नाही, तोवर मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही, तरीही ही बैठक घेण्यात आली आणि औरंगाबादचे संभाजीनगर शेवटच्या दिवशी निर्णय घेतला. खरेतर याबाबत याआधीही असे नामकरण करण्याची संधी होती, मात्र तेव्हा केले नाही. जाता जाता ठाकरे सरकारने मग संभाजीनगर, धाराशीव, दि.बा. पाटील असे निर्णय घेतले, हे निर्णय अवैध आहेत. आता आमचे सरकार येईल तेव्हा या निर्णयाच्या वैधतेबाबत तपासणी करू, या निर्णयाला आमचे समर्थन आहे, असे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यापुढे बाळासाहेबांचा विचार पुढे नेणार 

एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि बहुमताचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी चक्क एकनाथ शिंदे यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती आणि त्यामाध्यमातून भाजप १०५ जागा जिंकली आणि शिवसेना ५६ असे अपक्ष १७० निवडून आले होते. साहजिकच अपेक्षा होती कि भाजप आणि शिवसेनेचे सरकार तयार होईल, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती, पण दुर्दैवाने निकाल आल्यावर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना यांनी वेगळा निर्णय घेतला होता, विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ज्यांचा विरोध केला, हिंदुत्वाचा, स्वा. सावरकर यांचा विरोध केला अशा दोन्ही काँग्रेससोबत शिवसेनेने आघाडी केली आणि भाजपाला बाहेर ठेवले, हा खरा तर जनमताचा अपमान होता. महाविकास आघाडी आली, मागील अडीच वर्षांत या सरकारने युतीच्या कामांना स्थगिती दिली आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला, दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले, एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी दाऊदचा विरोध केला, दुसरीकडे त्याच्याशी संबंध आहे म्हणून एक मंत्री जेलमध्ये गेला, तरी त्याला मंत्री पदावरून हटवले नाही. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झाले, राज्यपालांचे पत्र आले तरी मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते, तरीही घेतले ते निर्णय वैध म्हणात येणार नाही तरीही त्याला समर्थनच असणार, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.