खुशखबर… राज्यात कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली

184

राज्यात दर दिवसाला कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा वाढत असताना गुरुवारी पहिल्यांदाच कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या हजारांहून जास्त आढळली. राज्यात ३ हजार ६४० नव्या कोरोना रुग्णांची संख्या आढळलेली असताना ४ हजार ४३२ कोरोना रुग्णांना उपचारातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाला. मात्र तीन रुग्णांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला.

कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली

बुधवारपर्यंत राज्यात २५ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत होते. परंतु गुरुवारच्या डिस्चार्ज संख्येंमुळे राज्यातील रुग्णसंख्या हजाराने कमी झाली. राज्यातील विविध भागांत आता २४ हजार ९४० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी मुंबई, अहमदनगर आणि कोल्हापूरात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान बळी गेला. तिस-या लाटेनंतर अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णाचा बळी झाल्याची नोंद झाली. नव्या कोरोना नोंदीत मुंबईत आणि त्यातुलनेत निम्मे पुण्यात दरदिवसाला कोरोना रुग्णसंख्या नोंदवली जाण्याचा क्रम दिसून येत आहे. मुंबईत गुरुवारी १ हजार २६५ तर पुण्यात ५१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल नवी मुंबई आणि ठाण्यात रुग्णसंख्या आढळून आली. नवी मुंबईत २१५, ठाण्यात २०२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. पिंपरी-चिंचवडमध्ये १९२ तर रायगडात १६६ कोरोनाचे रुग्ण आढळले.

( हेही वाचा : शरद पवार ते एकनाथ शिंदे! ४४ वर्षांनंतर ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती! )

राज्यात सर्वात जास्त उपचार घेणा-या रुग्णांची संख्या मुंबईत असली तरीही हा आकडा आता दहा हजारांच्या घरात खाली सरकल्याचे गुरुवारी दिसून आले. गुरुवारी मुंबईत १० हजार ६३० कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ठाण्यात ५ हजार ५७७ तर पुण्यात ४ हजार १५९, रायगडात १ हजार ३४० तर नागपूरात ४४५ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.