काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस का राहिले शेवटपर्यंत शिवसेनेसोबत

174

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र यावेळी त्यांनी बोलतांना आपल्याच माणसांनी दगा दिला,परंतु ज्यांच्या बाबत शंका उपस्थित केली जात होती त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. मात्र ज्या काँग्रेस पक्षातील काही गट सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी करत होती, तो पक्ष सरकार कोसळण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसा काय राहिला आणि सरकार पाडण्याचे पाप त्यांनी आपल्यावर माथ्यावर येऊ दिलं नाही.मात्र, या दोन्ही पक्षांबाबत शिवसैनिकांमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे.

( हेही वाचा : शरद पवार ते एकनाथ शिंदे! ४४ वर्षांनंतर ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती!)

मविआ सरकार गडगडले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव तसेच अन्य महत्त्वाच्या निर्णयावर एकमताने निर्णय घेतला गेला. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाही मंत्र्याने याला विरोध केला नाही. शिवसेनेचे चार मंत्री या बैठकीला होते आणि सर्वांनी एकमताने राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतील सर्व प्रस्तावना मंजुरी दिली. त्यामुळे ज्यांना दगाबाज म्हणून म्हटलं जातं होत, त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील सहकारी मंत्र्यांनी सरकार शेवटपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्तिगत फोन करून तसेच या दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी मला पूर्णपणे सहकार्य केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या फेसबुक लाईव्ह मधील संवाद दरम्यान सांगितले.

शिवसेनेचे ३९ आमदारांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत स्वतंत्र गट निर्माण केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनाची तयारी वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले आणि त्यांनी त्यांना राजीनामा न देता राजकारणाच्या सावी पाटावर आपली खेळण्याची मनसुबे जाहीर केले. परंतु पवार मैदानात उतरल्यामुळे या सर्व आमदारांचा गेम होईल आणि मग याचे सरकार टिकून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या बहुमताची चाचणीला सामोरे जाण्याची सूचना केल्यानंतर आणि याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि मविआ सरकार गडगडले.

उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काँग्रेस विषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक युतीला विरोध करत बाहेर पडलेल्या फुटीर आमदार फुटले असले तरी या दोन्ही पक्षातील सहकारी मंत्री व आमदार हे शेवटपर्यंत माझ्या आणि सरकारच्या पाठिशी राहिल्याचे उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते. ठाकरे यांनी बोलतांना, अशोक चव्हाण यांनी आपण हवे तर बाहेरुन पाठिंबा देतो पण तुम्ही रहा असे सांगितल्याचे जाहीर संवादा दरम्यान हे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काँग्रेस विषयी आता एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला व सरकार पडतानाही काँग्रेस कुठेही याचे पाप आपल्या अंगावर घेतलं नाही.काँग्रेसच्या गटाकडून वारंवार सरकारमधून पक्षाने बाहेर पडावे अशी मागणी होत होती, त्यातच काँग्रेसकडून शिवसेनेवर जोरदार टिकाही केली जायची. त्यामुळे ज्यावेळी शिवसेनेचे ३९ आमदार फुटले तेव्हाच काँग्रेसला बाहेर पडण्याची संधी होती. परंतु सरकार पाडण्याचे पाप आपल्या माथी मारुन न घेण्याची विशेष काळजी घेत काँग्रेसने सरकारच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला पण यामागील भूमिका त्यांची वेगळी होती,असे बोलले जात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला हे सरकार पडणार याची पूर्ण कल्पना असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना जाणीवपूर्वक राजीनामा देण्यास देण्यास नकार दिला. कारण जर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला असता तर हे सरकार आधीच कोसळ असतं. परंतु शिवसेनेची नाचक्की जेवढी येईल तेवढी करायची या शोधात पवार असल्याने त्यांनी उध्दव ठाकरे यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करत शिवसेना आणि ३९ बंडखोरांमधील संघर्ष वाढू दिला. जर त्यादिवशीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असता, तर पवारांच्या खेळीला महत्व आले नसते. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्यापासून त्यांना परावृत करत संसदीय आयुधांचा वापर करण्यास सुरुवात केली आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग होऊ शकला नाही. आणि अखेर उद्धव ठाकरे यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.