दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारले आहे. परंतु अनेकदा रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांचा वापर करावा लागते. याबाबत सोशल मिडियावर सुद्धा रेल्वेला टॅग करून तक्रारी केल्या जातात. यावर मात करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. देशभरातील गाड्यांची वैयक्तिकरित्या तपासणी करण्यासाठी रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात केले आहे.
५४४ स्वच्छतागृहांची तपासणी पूर्ण
प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांना २४ तास ट्रेनच्या एसी डब्यांमध्ये नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, प्रधान मुख्य तांत्रिक अभियंता यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रेल्वेने नियुक्ती केली आहे. यांनी या गेल्या काही दिवसांमध्ये ५४४ स्वच्छतागृहांची तपासणी केली. येत्या काही काळात अधिकाधिक गाड्यांमधील स्वच्छतागृहांची तपासणी करण्यात येणार आहे.
स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसणे, अस्वच्छता, गळती यामुळे रेल्वेप्रवासी त्रस्त होते. यावर रेल्वेने स्वच्छतागृहांची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community