एकामागून एक घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवार, २ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आता नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यानंतर केंद्रात घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथबद्ध व्हावे, यासाठी पक्षनेतृत्वाने आदेश दिला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Join Our WhatsApp Community