Sharad pawar gets income tax notice: राज्याच्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत इनकम टॅक्सची नोटीस आल्याचे सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इनकम टॅक्सकडून 2004,2009,2014 आणि 2020 च्या लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इनकम टॅक्सने नोटीस पाठवली आहे. यावेळी बोलताना, पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले
दिल्लीचे अदृष्य हात कसे काम करतात ते आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी सुचना आलेली असावी असे दिसत आहे. कदाचित त्यांची इच्छा नसावी, असे शरद पवार म्हणाले.
( हेही वाचा: पावसाने रस्ते जलमय, वाहतूक झाली विस्कळीत )
राज्यात असते तर काही करु शकलो असतो
एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार त्यांच्यापासून वेगळे होतील असे वाटत नाही. कारण त्यांच्यात जी काही देवाणघेवाण झाली ती मोठी आहे. जर हे आमदार महाराष्ट्रात असते तर मी काही करु शकलो असतो. पण हे आमदार राज्याच्या बाहेर होते , असे पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community