गेल्या 9 दिवसांपासून राज्यात सुरू असलेली राजकीय लढाई आता संपली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे सल्ले देखील दिलेत.
काय म्हणाले राज ठाकरे
गुरुवारी शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना महत्वाचे दोन सल्ला देणारे ट्विट केले. राज ठाकरेंनी लिहिलं, “बेसावध राहून नका, सावधपणे पाऊले टाका…” एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तुम्ही स्वीकारत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. याचा आम्हाला आनंद वाटतो. कायद्याने तुम्हाला ही संधी दिली आहे. तुम्ही तुमच्या कर्तुत्वाने ते सिद्ध कराल, असे राज ठाकरे म्हणाले.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
(हेही वाचा – ‘ठाकरे’ सरकार पडल्यानंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट चर्चेत!)
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात राज ठाकरे यांनी कोणतेच वक्तव्य केले नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी दोनदा फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजते. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर, राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक जाहीर संदेश पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी उद्धव यांचा खरपूस समाचार घेतला आणि लिहिलं, “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता.”
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022