शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या याचिकेवरील सुनावणी 11 जुलैऐवजी तातडीने घ्या अशी मागणी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत, शिवसेनेला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. 11 जुलैलाच या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
( हेही वाचा: Income Tax Notice: शरद पवार यांना इनकम टॅक्सची ‘या’ प्रकरणांत नोटीस )
3 आणि 4 जुलै रोजी बहुमत चाचणी
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता शिंदे गट व भाजपचे सरकार राज्यात सत्तारुढ झाले आहे. या नव्या सरकारला आता राज्यपालांच्या निर्देशांनुसार बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी राज्यपालांनी 3 जुलै आणि 4 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सुचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार आहेत. शिंदेंनी आमचा गट हाच शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
Join Our WhatsApp Community