IRCTC: तुम्ही भोलेनाथचे भक्त आहात! मग ‘हे’ फायदेशीर Air टूर पॅकेज खास तुमच्यासाठी

164

जर तुम्ही भोलेनाथचे भक्त आहात आणि तुम्ही श्रावणमध्ये महाकालेश्वरसह ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर शंकर भगवान यांच्याशी संबंधित मुख्य तीर्थक्षेत्रांना IRCTC द्वारे फायदेशीर किंमतीत तुम्हाला भेट देता येणार आहे. IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला इंदौर आणि उज्जैनमधील वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात येणार असून या पॅकेजचे नाव आहे Glimpses of Madhya Pradesh – Ujjain and Indore असे आहे.

किती असणार भाडं

IRCTC ने ट्विट करून या हवाई टूर पॅकेजची माहिती दिली आहे. हे टूर पॅकेज एकूण 6 दिवस आणि 5 रात्रीचे असणार आहे. या पॅकेजचे भाडे 27 हजार 150 रुपये प्रति व्यक्ती असे असेल. या पॅकेजमध्ये प्रवाशाची जाण्यासाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था समाविष्ट आहे. हे पॅकेज लखनौपासून सुरू होणार असून या पॅकेजचा प्रवास 5 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल, असे रेल्वेकडून सांगितले गेले आहे.

irctc

कुठे कुठे जाता येणार

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हरसिद्धी मंदिर, काल भैरव मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महेश्वर अहिल्या किल्ला, अहिल्या माता, राजगद्दी दर्शन, राजेश्वरी मंदिर नर्मदा नदी, राणी रूपमती मंडप, मांडू येथील रानी रूपमती पवेलियन, जहाल महाल, हिंडोला महल, इको पॉईंट आणि नीलकंठ मंदिरात जाण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे.

किती आहे टूर पॅकेज

पॅकेजच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंफर्ट क्लासमध्ये ट्रिपल ऑक्यूपेंसी प्रति व्यक्ती खर्च रु. 27,150 आहे. डबल ऑक्यूपेंसीवर प्रति व्यक्ती 28,850. तर सिंगल ऑक्यूपेंसीचा प्रति व्यक्ती खर्च 36,500 रुपये आहे. 5 ते 11 वर्षांच्या मुलासाठी 23,750 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

असे करा बुकिंग

आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटला ऑनलाइन भेट देऊन या टूर पॅकेजसाठी तुम्ही बुकिंग करू शकतात. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, विभागानुसार असलेल्या कार्यालयात आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.