राज्यात १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो. कृषी सप्ताह १ जुलै ते ७ जुलै यादरम्यान साजरा केला जातो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असून कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
(हेही वाचा – “मी पळपुटा नाही, माझा ED वर विश्वास”; चौकशीपूर्वी राऊतांचा सूर बदलला)
यासह एकनाथ शिंदेंनी ट्विट करत असेही म्हटले की, महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. ते पुढे असेही म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा मातीतून सोनं पिकवत भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी हात देणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना शतशः प्रणाम…
कृषी दिनाबद्दल…
राज्यात १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. १ जुलै ते ७ जुलै यादरम्यान, कृषी सप्ताह साजरा केला जातो. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ कृषी दिन साजरा करण्यात येतो. वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान हे भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात आहे. १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला तेव्हा पासून शासकीय पातळीवर कृषी दिन साजरा केला जात आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा मातीतून सोनं पिकवत भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी हात देणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना शतश: प्रणाम….#महाराष्ट्र_कृषी_दिन pic.twitter.com/ci1jtJvVcc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2022