आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाचे दर्शन १ जुलै म्हणजेच आजपासून २४ तास सुरू करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येतात. जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी विठ्ठल दर्शन २४ तास सुरू ठेवण्यात आले आहे.
( हेही वाचा : New Government Scheme : सरकार देणार महिलांना मोफत शिलाई मशीन! वाचा काय आहे योजना)
२४ तास दर्शन सुरू
कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर आषाढी वारी होत असल्याने पंढपुरात भाविकांची विक्रमी गर्दी होईल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. भक्तांना २४ तास विठ्ठल दर्शन होणार असल्याने एका तासाला जवळपास अडीज ते तीन हजार भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकणार आहेत.
‘आषाढी वारी 2022’ ॲप
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘आषाढी वारी 2022’हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community