एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला मोठे गिफ्ट दिले. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी होत होती. परंतु ती मागणी मान्य होतच नव्हती. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. याबद्दल रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांनी विशेष आभार मानले. सामंत हे शिंदे गटात शेवटच्या क्षणी सामील झाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये उदय सामंत हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री होते.
शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे कारस्थान
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती. पुढील वर्षापासून या नवीन शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणे शक्य होणार आहेत. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तर उदय सामंत यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्यासरकारी वैदयकीय महाविद्यालयाचा(Medical Collage)प्रश्न मार्गी लागणार, पुढच्या वर्षी होणार कॉलेज मध्ये प्रवेश, रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होऊन आरोग्य सुविधेत होणार आमूलाग्र बदल,मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वैद्यकीय
विभागाला आदेश.— Uday Samant (@samant_uday) July 1, 2022
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे उदय सामंत म्हणाले होते. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
(हेही वाचा शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)
Join Our WhatsApp Community