अनियमित आहार, प्रदूषण तसेच झपाट्याने बदलती जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांमुळे सध्या केस खूप खराब होतात, ज्यामुळे ते निर्जीव आणि कोरडे होऊ लागतात. 25 ते 30 वर्षांच्या तरुणांच्या डोक्यावरही आजकाल पांढरे केस दिसतात. पिकलेल्या केसांमुळे आत्मविश्वास कमी होतो. ( White hair problem solution)
अशा परिस्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातच यावर उपाय आहे. वय झाल्यावर केस पांढरे होणे सहाजिकच आहे. पण अकाली केस पांढरे होण्याने आपला आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे केस अकाली पांढरे झाल्यास, मोहरीच्या बियांचा वापर करुन तु्म्ही पांढरे केस पुन्हा काळे करु शकता. (Your guide to grey hair treatment)
मोहरीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए असते. या ए व्हिटॅमिनमुळे टाळूचे पोषण होते, तसेच केसांचे पुनरुत्पादन आणि कोलेजन वाढते. याशिवाय मोहरीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन-ई सारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि काळेपणा परत येण्यास मदत होते.
( हेही वाचा: व्हॉट्सअॅपचे नवे फिचर; आता कोणाच्याही नकळत होता येणार Group मधून Left )
मोहोरीचा वापर कसा करायचा
- मोहरीच्या दाण्यापासून काढलेले तेल केसांच्या आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. प्रथम तेल गरम करा आणि नंतर केस आणि टाळूला मसाज करा. यामुळे मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढेल आणि केस हळूहळू काळे होतील.
- सर्वात आधी मोहरीला बारीक करुन वाळवून पावडर तयार करा. आता एका स्वच्छ भांड्यात एक चमचा मोहरी पावडर आणि एक अंडे मिसळा. आता त्यात खोबरेल आणि एरंडेल तेल मिसळून हेअर मास्क तयार करा आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. शेवटी शॅम्पू आणि स्वच्छ पाण्याने केस धुवा.