कोविड काळात ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे मुलांच्या अभ्यासाचा दर्जा घसरल्याने आता मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची आता पायाभूत क्षमता चाचणी घेऊन त्यांच्या गुणवत्तेची चाचणी केली जाणार आहे. जुलै महिन्यापासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची त्या त्या इयत्तेतील अभ्यासक्रमानुसार त्यांना तो अभ्यास येतो का हे या पायाभूत क्षमता चाचणीमध्ये पाहिले जाईल आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी घेत अभ्यासात कच्या असलेल्या मुलांना आता अभ्यासात अधिक हुशार बनवले जाणार आहे.
गुणवत्तेची चाचणी केली जाणार
कोविड काळात शालेय शिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने देण्यात आले होते. खासगी शाळांसह महापालिका शाळांमध्येही ऑनलाईन शिक्षण देण्यात आल्याने मुलांना अभ्यासात तेवढे प्राविण्य मिळवता आले नाही. या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे मोठ्याप्रमाणात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमानुसार मुलांमध्ये प्रगती आढळून न आल्याने महापालिका शिक्षण विभागाने शाळांमधील हुशार बनवण्याच्या दृष्टीकोनातून पायाभूत क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती किती आहे याचीच ही चाचणी असणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार असून या प्रश्नपत्रिकेतील उत्तरानुसार मुलांची अभ्यासातील प्रगती दिसून येईल थोडक्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती किती आहे याचीच ही चाचणी असणार आहे.
( हेही वाचा : New Government Scheme : सरकार देणार महिलांना मोफत शिलाई मशीन! वाचा काय आहे योजना)
महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी याबाबत बोलतांना, महापालिका शाळांमधील मुलांची क्षमता तपासण्यासाठी आता बेसलाईन इव्हॅल्यूशन करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून प्रत्येक मुलांच्या चाचण्या घेण्यात येणार असून त्यामध्ये कोणता विद्यार्थी अभ्यासात कच्चा आहे याची माहिती समोर येईल आणि त्यानुसार त्यांच्यावर पुढील संस्कार केले जातील. तीन टप्प्यात या चाचण्या घेऊन त्यांच्या अभ्यासात सुधारणा करून घेत प्रत्येक विद्यार्थ्यांना हुशार बनवण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community