महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारी घटना घडली. शिवसेनेतून ४० आमदार वेगळे करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार पाडले आणि त्या पाठोपाठ भाजपा-शिंदे गटाचे सरकार महाराष्ट्रात आले. मात्र त्या दरम्यान १० दिवस शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष असे ५० आमदार हे गुवाहटीला रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्याठिकाणी आमदारांची राजशाही थाटात राहण्याची सोय करण्यात आली होती. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ज्या शब्दांत आमदारांच्या राहण्याच्या सोयीचे वर्णन केले हे जगभर पसरले. ‘काय झाडी, काय डोंगूर, काय हाटील…एकदम ओक्केमध्ये’, असा संवाद सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्या आमदारांचा राहण्याचा खर्च तब्बल ७० लाखांपर्यंत पोहचला होता, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
जेवणाचे बिल 22 लाख रुपये
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सूरतमार्गे गुवाहटीमध्ये मुक्कामी होते. गुवाहटीमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिंदे गट आठ दिवस मुक्कामी होता. या आठ दिवसांत लाखो रुपयांचा खर्च झाला. फक्त जेवणाचे बिल 22 लाख रुपये झाले, 15 दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी मुंबई सोडल्यानंतर पहिला मुक्काम सूरतमध्ये केला. त्यानंतर ते गुवाहटीला गेले. महाराष्ट्रात येण्यासाठी नंतर ते गोव्यात आले आहेत. गुवाहटीतील रॅडिसन ब्ल्यूमध्ये आठ दिवस शिंदे गट होता. यामध्ये तब्बल 70 लाखांच्या आसपास खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा शिंदे सरकार राज्यपालांना पाठवणार 12 आमदारांची नवीन यादी)
७० खोल्या केलेल्या बूक
एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी रॅडिसन ब्ल्यूमध्ये तब्बल 70 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. बंडखोर आमदारांमुळे हॉटेल व्यवस्थापनाने 22 ते 29 जून यादरम्यान अन्य ग्राहकांसाठी रेस्रॉ, बँक्वेट आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या. एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधील मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स रुममध्ये होता. हॉटेलच्या वेबसाईटनुसार, एक खोलीचे भाडे 7500 ते 8500 रुपये प्रति दिवस इतके होते. सवलत आणि टॅक्स धरून 70 खोल्यांचे भाडे जवळपास 68 लाख रुपयांच्या घरात जाते.
Join Our WhatsApp Community