उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लाॅंड्रींग प्रकरणात मोठा दिलासा

149

राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. ठाकरे सरकार कोसळल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र दुसरीकडे त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठ दिलासा मिळाला आहे. पाटणकर यांच्यावर झालेल्या मनी लाॅंड्रींग प्रकरणी कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा रिपोर्ट सीबीआयकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे आणि न्यायालयाने तो स्वीकारला आहे.

84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने युनियन बॅंकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पु्ष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. या प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईत श्रीधर पाटकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली होती. मात्र ईडीचा विरोध असूनही शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.

( हेही वाचा: काय हाटील, काय रूम, काय पैसा…शिंदे गटावर किती खर्च झाला? )

काय आहेत आरोप? 

चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुप कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत हमसफर डीलर प्रा.लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मीती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचे दाखवले, असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.