उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास NIA , ATS कडे; 21 जूनला झाली होती निर्घूण हत्या

154

अमरावतीमध्ये 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिकाची गळा कापून निर्घूण हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे असे या व्यावयासिकाचे नाव आहे. दरम्यान, आता या हत्या प्रकरणाचा तपास NIA आणि ATS कडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे.

काय आहे प्रकरण

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्यामागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? कारण मृतक कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने, त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशीची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती.

( हेही वाचा: एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कारवाईला कायद्याने उत्तर देणार; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा )

धर्मांध लोकांच्या कारवाया चिंताजनक

नुपूर शर्मांचे समर्थन अमरावती शहरातील ज्या लोकांनी केले होते. त्यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे शहरात संतापाची भावना निर्माण झाली. अशा परिस्थितीत कोल्हे यांची झालेली हत्या संशय निर्माण करत आहे. शहरात धर्मांध शक्तीच्या वाढलेल्या कारवाया, चिंताजनक आहेत. पुढे जाऊन परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे सुत्रधार कोण हे शोधणे आवश्यक असल्याचे, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता हा तपास NIA आणि ATS देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.