Maharashtra Assembly session: आतापर्यंत कोणी-कोणी भूषविले विधानसभा अध्यक्षपद, बघा पूर्ण यादी

153

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले. तर त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केलाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना १६४ तर राजन साळवींना १०७ मतं मिळाली. तर रईस शेख, अबू आझमी आणि फारूख अन्वर या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत होती, त्यामध्ये भाजपने बाजी मारल्याचे समोर आले. पण आतापर्यंत कोणी-कोणी भूषविले विधानसभेचे अध्यक्षपद…बघा पूर्ण यादी

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर)

विधानसभा अध्यक्ष (१९३७ ते फेब्रुवारी २०२२) 

मुंबई राज्य विधानसभा  (१९३७ ते १९६०)

१. गणेश वासुदेव मावळणकर – २१ जुलै १९३७ ते २० जानेवारी १९४६
२. कुंदनमल सोभाचंद फिरोदिया – २१ मे १९४६ ते ३१ जानेवारी १९५२
३.  दत्तात्रय काशिनाथ कुंटे – ०५ मे १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६

द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)

४ सयाजी लक्ष्मण सिलम – २१ नोव्हेंबर १९५६ ते ३० एप्रिल १९६०

महाराष्ट्र विधानसभा (१९६० पासून)

५. सयाजी लक्ष्मण सिलम – ०१ मे १९६० ते १२ मार्च १९६२
६. त्र्यंबक शिवराम भारदे –  १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७
–  १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२
७. शेषराव कृष्णराव वानखे  -२२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७
८. दौलतराव श्रीपतराव उर्फ बाळासाहेब देसाई – ०४ जुले १९७७ ते १३ मार्च १९७८
९. शिवराज विश्वनाथ पाटील – १७ मार्च १९७८ ते ०६ डिसेंबर १९७९
१०. प्राणलाल हरकिश व्होरा – ०१ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०
११. शरद शंकर दिघे – ०२ जुलै १९८० ते ११ री १९८५
१२. शंकरराव चिमाजी जगताप – २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०
१३. मधुकरराव धनाजी चौधरी – २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५
१४. दत्ताजी शंकर नलाव – २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९
१५. अरुणलाल गोवर्ध गुजराथी – २२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टोबर २००४
१६. कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर – ०६ नोव्हेंबर, २००४ ते ०३ नोव्हेंबर २००९
१७. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील – ११ नोव्हेंबर २००९ ते ०८ नोव्हेंबर २०१४
१८. हरिभाऊ किसनराव बागडे – १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९
१९. नाना फाल्गुनराव पटोले – ०१ डिसेंबर २०१९ पासून ०४ फेब्रुवारी, २०२१
२०. नरहरी सिताराम झिरवळ – ०४ फेब्रुवारी, २०२१ पासून ३ जुलै २०२२
२०. राहुल नार्वेकर – ३ जुलै २०२२

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.