विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची बहुमताने निवड झाली. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर काही नेत्यांकडून सभागृहात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
(हेही वाचा- Maharashtra Assembly session: “…पण ५० आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला हे माझं भाग्य”)
काय म्हणाले फडणवीस
राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष आहे. अध्यक्षाची भूमिका न्यायमूर्तीसारखी असते आणि महाराष्ट्राने हा नवा रेकॉर्ड केला आहे. तुमच्या मतदारसंघात कामासाठी आलो तेव्हा कोणीही तुमच्याबद्दल तक्रार करणारं कोणी सापडलं नाही, तर कित्येक लोकहिताची कामे केली, असे म्हणत फडणवीसांनी नार्वेकरांचे तोंडभरून कौतुक केले. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नार्वेकरांना म्हणाले, तुम्ही कायदेतज्ज्ञ आहात. अनेक संस्थाचे कायदेतज्ज्ञ म्हणून तुम्ही काम केले त्यापेक्षाही महत्त्वाचे काम तुम्ही याठिकाणी देणार आहात. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, याकरता आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जावई-सासऱ्याचं एकमत होणं कठीण!
मिश्किलपणे टिपण्णी करताना पुढे फडणवीस असेही म्हणाले, आज हाही योगायोगही असेल की, विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात सभापती रामराजे निंबाळकर आणि कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जणु सासरे-जावाई आहेत. पुलं देशपांडे म्हणायचे, जावाई-सासऱ्याचे एकमत होणं कठीण आहे. तर जावायचा उल्लेख पुलं देशपांडे जावाई हा सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह असा करतात,पण त्यांचे प्रेम आहे सासऱ्यांवर , काळजी करू नका, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community