विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १२ सदस्य गैरहजर, सर्वाधिक राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश

172
राज्यात शिवसेनेतून ३९ आमदार फोडून शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले, नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर रविवारी, ३ जुलै रोजी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात आले. त्यामध्ये एकूण २८७ विधानसभा सदस्यांपैकी १२ सदस्य गैरहजर होते, त्यातील २ भाजप, २ काँग्रेस, ७ राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या एका आमदाराचा समावेश होता.

अजित पवार यांचे समर्थक गैरहजर 

  • निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष आणि एआयएमचे तीन आमदार मतदानात तटस्थ राहिले.
  • शिरणगतीमध्ये राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली, तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
  • बहुजन विकास आघाडी, मनसे आणि अपक्ष आमदारांनी भाजपाच्या बाजूने उभे राहिले.
  • राष्ट्रवादीकडून सात आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय भुवया उंचावल्या.
  • माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत.
  • माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते सभागृहात येऊ शकले नाहीत.
  • पारनेरचे आमदार निलेश लंके आजारी असल्याचे बोलले जात आहे.
  • अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे बबनदादा शिंदे, खेडचे दिलीप मोहिते, पिंपरीचे अण्णा बनसोडेही मतदानासाठी अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
  • तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदानात भाग घेतला नाही.

(हेही वाचा जयंत पाटलांनी विधानपरिषद सभापती पदावर दिले वेगळेच संकेत!)

कोणते सदस्य होते गैरहजर? 

भाजपा
  • मुक्ता टिळक
  • लक्ष्मण जगताप
काँग्रेस 
  • प्रणिती शिंदे
  • जितेश अंतापुरकर

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

राष्ट्रवादी 
  • नवाब मलिक
  •  अनिल देशमुख
  • निलेश लंके
  • दिलीप मोहिते
  • दत्तात्रेय भरणे
  • अण्णा बनसोडे
  • बबनदादा शिंदे
एमआयएम
मुफ्ती इस्माईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.