मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने नोटीस दिली आहे, त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संजय पांडे आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते, त्यांच्याजागी विवेक फणसाळकर यांची निवड झाली आहे. फणसाळकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
कोट्यवधी रुपये वळवले
संजय पांडे यांना आता ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांना हजर राहायला सांगितले आहे. त्यामुळे पांडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कोट्यवधी पैसे कोलकत्ता मार्गे शेल कंपनीत वळवल्याच्या प्रकरणात संजय पांडे हे आरोपी आहेत. या जुन्या प्रकरणात पांडे यांचे चौकशी होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पांडे यांनी भाजपाच्या नेत्यांच्या मागे चौकशी सत्र सुरु केले होते, त्यामुळे पांडे यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार, अशी चर्चा ऐकिवात येत आहे.
(हेही वाचा मेट्रो पर्यावरणपूरकच, आरे कारशेड विरोधातील आंदोलन स्पॉन्सर्ड – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )
संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती, त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते, परंतु त्या कालावधीत त्याने कोणतेही उल्लंघन केले नाही आणि अशा प्रकारे CBI ने फर्मची चौकशी सुरू केली आणि आता ED देखील फर्मची चौकशी करत आहे.
Join Our WhatsApp Community